
दै : सारथी महाराष्ट्राचा / प्रतिनिधी – कृष्णा गायकवाड
विशेष नाशिक पुन्हा हादरले धक्कादायक चांभार लेणीच्या डोंगरात विद्यार्थिनीने गळफास घेत संपवले जीवन यात्रा याबाबत सविस्तर ही तरुणी मूळ सुरगाणा तालुक्यातील रहिवासी असल्याचा निर्वाळा ..म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद दाखल दिनांक 14 एप्रिल रोजी मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील चांभार लेणीच्या डोंगरात एका झाडाला शालेय विद्यार्थिनींना गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .
याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की मनीषा अशोक चौधरी राहणार गांगुरा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या शालेय विद्यार्थिनींना मृतदेह चांभार लेणी डोंगराला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे .ही बाब पोलीस हवालदार भाऊराव त्रंबक गवळी नेमणूक म्हसरूळ पोलीस ठाणे यांना कळताच यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरक्षक अतुल डहाके यांना कळविले पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना करत घटनेच्या पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले हा गळफास मुलीने ओढणीच्या साह्याने घेतला असल्याचे आढळून आले.
ही तरुणी नाशिक शहरात शिक्षणासाठी आली असल्याचे समजते दरम्यान तिने टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत अद्याप अस्पष्टता असून पुढील तपास अतुल डहाके पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सदानंद फुगे हे करत आहेत ही घटना मयतांच्या कुटुंबियाला कळतच त्यांनी नाशिककडे धाव घेतली आहेत मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. माञ या घटनेने सदरील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post