महामानवाला अभिवादन करून गोवारी समाजातील वर वधु चढले बोहल्यावर
गोंडपिपरी :तालुक्यातल्या लिखितवाडा याठिकाणी पुरोगामी विचार जपणाऱ्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला आहे.लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत लिखितवाडा येथे गोवारी समाजातील नवदाम्पत्यांचा एक अनोखा लग्न सोहळा पार पडला.लग्नात वर आणि वधुंनी दीन दलितांचे कैवारी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून लग्नाच्या बेडीत अडकलेत.
‘लग्न ‘ ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रुढी आणि त्यातून होणारे शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याचे दिसते. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा या गोष्टींच्यामुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागताना आपण पाहत आलो आहोत. या सर्व अनिष्ट प्रकारांना या वर वधूंनी सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला.मात्र दिखाऊपणाच्या या जगात याला फारस कोणी महत्त्व देत नाही.
तालुक्यातील लिखितवाडा येथील वासुदेव नागाजी राऊत यांचा मुलगा मारोतीचे लग्न भारती संग विवाह निश्चित झाला,पण हा विवाह अनोख्या पद्धतीने करायचा असा निर्णय दोन्ही नव दांपत्यांनी घेतला. शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या उच्च शिक्षित जोडप्याने सर्व रूढी-परंपरांना बाजूला सारत महामानवाला अभिवादन करून नव्या संसाराची सुरुवात केली.हा विवाह याठिकाणी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
असा पार पडला,अनोखा लग्न सोहळा
मंडपात डॉ.बाबासाहेब आंबडेकर,पूनेम मुठवा पहांदी पारी कुपार लिंगो व ११४ शहीद आदिवासी गोवारी समाज यांचे फोटो लावण्यात आले होते. यावेळी लग्न मंडपात नवरा आणि नवरीचे आगमन होताच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कुलदैवत यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्न विधीच्या कार्याला सुरुवात केली.आजच्या समाजाला फुले,शाहू,आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.आणि या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठ माती मिळेल,याशिवाय खर्चाला ही मोठा फाटा मिळू शकते, त्यामुळे समाजाने थोर पुरुषांचे विचार आत्मसाद करून त्यांच्या ध्येय धोरणावर चालल्यास अनिष्ट रूढी परंपरांना चालना मिळणार नाही.
तरुणांनो थोर पुरुषांना स्मरण करून विवाह करा,नव वधू-वरांचे आवाहन
लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदांपत्यांना लग्न सोहळा बद्दल आनंद व्यक्त केला आहे. नववधू असणाऱ्या भारती यांनी प्रत्येक मुलीची इच्छा ही तिचं लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं असतं पण माझं महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन माझा विवाह संपन्न झाला,याचा मला खूप खूप आनंद होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केला.नवरदेव मारोती यांनी म्हणाले की, आपल्या भूमितील दीन दलितांचे कैवारी, महामानवाच्या प्रेरणेतून हा विवाह सोहळा संपन्न झाला.ज्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला याचे मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी जो संदेश दिला आहे,त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना श्रद्धांजली म्हणुन अनोख्या पद्धतीने विवाह केला पाहिजे ,असे आवाहन केले.
Discussion about this post