


प्रतिनिधी नित्यानंद मोरे..
सातारा जिल्हा वाई तालुक्यात 14 एप्रिल रोजी “विश्वरत्न” महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.
यावेळी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भीम ज्योतींचे आगमन जय भीमच्या गजरात होत असते. यावेळी महाड येथील चवदार तळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांचे प्रेरणास्थान असून या ठिकाणावरून अनेक भीम ज्योतींचे जय भीम च्या गजरात जल्लोषात आगमन होत असते.या भीम ज्योतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष वाई विधानसभा यांचे वतीने येणाऱ्या सर्व भीम ज्योतींचे जय भीम च्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. तसेच येणाऱ्या सर्व अनुयायांना थंड सरबतचे वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी वर्ग यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून “विश्वरत्न” महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष वाई विधानसभा अध्यक्ष. प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष. विजय सातपुते, वाई शहराध्यक्ष. रणवीर परदेशी, युवा अध्यक्ष.आकाश भाई गायकवाड.अक्षय भाई गायकवाड, उपाध्यक्ष.बंडा कवळे तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते.
Discussion about this post