सोयगाव (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली असून, मंगळवारी पंचायत समितीच्या बचत भवन सभागृहात २०२५-३० या कालावधीसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ४६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या या सोडतीत २३ महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली असून, यामुळे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.
ही सोडत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी तर गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार संभाजी देशमुख, सहायक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार:
- सर्वसाधारण प्रवर्ग – १२
- सर्वसाधारण महिला – १२
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – ६
- OBC महिला – ६
- अनुसूचित जाती (SC) – २
- SC महिला – २
- अनुसूचित जमाती (ST) – ३ (महिला), ३ (पुरुष – सर्वसाधारण)
या आरक्षण यादीमुळे स्थानिक राजकारणाला उधाण येणार असून, सोयगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार आहे.

Discussion about this post