आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर विभागातील आठ जिल्ह्यांमधील 349 संगणक प्रशिक्षक यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या विषयाशी अनुसरून एक दिवशीय कार्यशाळा मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. आधुनिक युगात टीकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकाशी मैत्री करावी लागेल व त्याच्यासाठी त्यांना संगणक हाताळण्याची सवय लावण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील डिजिटलायझेशन विषयीची भीती दूर करण्यासाठी,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक माननीय श्री संजय यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातील 647 शाळा व गटसंधान केंद्र येथे संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक प्रशिक्षक देण्यात आले असून त्यांना मार्गदर्शनासाठी ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेसाठी कन्सल्टिंग लिमिटेड च्या आयसीटी प्रोजेक्ट मॅनेजर राफिया मॅम सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सांगळे सर छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका उपस्थित होते यांनी सुद्धा संगणक प्रशिक्षकांना मुलाचे मार्गदर्शन केले.
Discussion about this post