कठोरा पुनर्वसन भागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बुद्धविहार बांधकाम, सौंदर्यकरण व वॉल कंपाऊंडसाठी शासकीय निधी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी दिले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश साबळे, सरपंच प्रवीण अळसपुरे, उपसरपंच गजेंद्र काळबांडे, ज्येष्ठ शेतीतज्ञ साहेबरावजी विधळे, माजी सरपंच भास्करराव काळबांडे, तसेच पंकज काळबांडे, आशिष महल्ले, शरदराव महले, प्रकाशराव ढोके, श्री दुर्गे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Discussion about this post