भगूर (विलास डी. भालेराव) – शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमांनी, मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्यात साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंती उत्सव समिती, विविध संघटना, मंडळे आणि संस्थांच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी अभिवादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी आंबेडकर चौकातील बौद्ध विहारात माजी नगराध्यक्ष भारती साळवे, अनिता करंजकर यांनी माता रमाबाई आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना शहराध्यक्ष विक्रम सोनवणे, रिपाइं शहराध्यक्ष अजय वाहणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. विशाल बलकवडे, शरद उबाळे, दिपक बलकवडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर भाषण करून उपस्थितांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाला प्रमोद घुमरे, विक्रम झनकर, अलोक साळवे, किशोर करंजकर, मीना साळवे, रतन साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन बौद्धवंदना म्हटली.

ज्येष्ठ नागरिक संघ, भगूर यांच्या वतीने शिवाजी महाराज चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमात अध्यक्ष खंडेराव गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याला, काशिनाथ उबाळे यांनी शिवाजी महाराज पुतळ्याला आणि शिवाजी घोरपडे यांनी स्वा. सावरकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमात काशिनाथ उबाळे, श्रीराम कातकडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दलित हौसिंग सोसायटी, दगडचाळ येथील आंबेडकर पुतळ्याचे पूजन सुनील आणि सौ. कटारे यांनी बौद्ध धम्म पद्धतीने केले.
नगरसेवक नरेंद्र गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सार्थक कटारे, रंजना कटारे, व्ही.डी. भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post