मानोरा तालुक्याचे नाव केले उज्वल
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : पोहरादेवी येथिल रहवाशी आणि रामगाव (ता.धामणगाव रेल्वे ) येथिल जि.प.शाळेचे शिक्षक सुनिल राठोड यांना बालरक्षक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य बालरक्षक टिमच्या पुढाकाराने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वंयप्रेरणेने काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो किनो एज्यूकेशन सोसायटी मालेगाव( नाशिक) व बालरक्षक टिम महाराष्ट्र यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.रईस शेख सर, श्री.राठोड साहेब,
NCERT च्या माजी उपसंचालिका श्रीमती.शोभा खंडारे मॅडम आणि शिक्षणाधिकारी श्रीमती.सुचिता पाटेकर मॅडम आदिच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाले शाळा व गावकरीच्या वतीने श्री.सुनिल राठोड यांचे अभिनदन केले
Discussion about this post