शिराळा / प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करत असताना त्यांच्या विचारांचेही पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
कांदे ता.शिराळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. नाईक पुढे म्हणाले, देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे शिल्पकार व भारत देशाचे निर्माते म्हणून संबोधले जाते. या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊन आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम केले.महिलाना सन्मानाचे जीवन देऊन अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, देशाला समता, बंधुता आणि न्यायाची राज्यघटना तयार करून देण्याचे काम केले. या महान कायदे पंडित, ज्ञानाच्या महासागर, विश्वरत्न, दुखितांचे, पीडितांचे कैवारी, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त यांच्या विचाराचे पालन होणे गरजेचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कांदे गावातील बांधवांनी नालंदा वाचनालयाची केलेली निर्मिती भविष्य काळामध्ये वटवृक्षांमध्ये रूपांतर निश्चितपणे होईल.
यावेळी शिराळा पोलिस उप निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, कॉन्स्टेबल विनोद पाटील ,सरपंच रोहित शिवजातक उपसरपंच छन्नुसिंग पाटील, चेअरमन नानासो भडकिमकर,व्हा.चेअरमन अनिल पवार,गजानन पाटील सुभाष पाटील संजय पाटील, धनाजी पाटील, दिलीप शिवजातक, अमोल पाटील,सागर पाटील, माधव मोहरेकर, शशिकांत पाटील,नवनाथ कुंभार, बादशहा नदाफ, जालिंदर पवार,दयानंद शिवजातक, प्रविण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post