मुंबई | श्रीरामपूर शहरातील माजी नगराध्यक्ष संजयजी फंड, उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, नगरसेवक श्यामलिंग शिंदे, आशीष धनवटे, राजू आदिक, तसेच पंचायत समितीचे उपसभापती सुनील क्षीरसागर, सरपंच विराज भोसले, चेअरमन दिगंबर फरगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण आणि जिल्हा प्रभारी मा. विजयजी चौधरी यांच्या उपस्थितीत सर्वांना पक्षात स्वागत करण्यात आले.
श्रीरामपूर व तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
Discussion about this post