संजय प्रधान ता. हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी :
इसासणी (हिंगणा) : सध्या महावितरनाचे आणि ग्राम पंचायती चे भोंगळ कारभार परिसरातील रहीवासिंना दिसून येत आहे.
त्या मुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एकी कडे भर दिवसा रसत्यावरील पथ दिवे दिवसभर सुरू असतांना दिसून येत आहेत तर दुसरी कडे रात्री 1 वाजे पासून ते सकाळी 6 च्या सुमारापर्यंत विजेची लोड शेडींग केली जात आहे या अजब गजब कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
उन्हाळा आला असून उष्णतेमुळे लोकांना पंखे,कुलर,ac शिवाय झोप लागत नाही. अशात वीज गेली तर डासांचे प्रकोप नागरिकांना झोपू देत नाही या सर्व बाबीं कडे महावितरणचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
आता नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे की, आमच्या हक्काची वीज मोठ मोठ्या उद्योगांना वाढीव दरात महावितरण विकत तर नाही ना? हा त्रास मोठ्या उद्रेकात निर्माण न व्हावे म्हणून, लवकरात लवकर काय बिघाड आहे ते दुरुस्ती करून नागरिकांना या त्रासातून बाहेर काढण्याचे कार्य महावितरण ने करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
#HINGNA NEWS #सारथी महाराष्ट्राचा
Discussion about this post