बारामती :- अक्षय कांबळे
पणदरे ता: बारामती येथे आयोजित मोफत सायकल व शालेय खर्च वाटप मा.युगेंद्र दादा पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला व उपस्थिताना संबोधित केले सामाजिक उन्नती आणि सार्वंगीण विकास होण्यासाठी काही उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. गावखेड्यातील सावित्रीच्या लेकींची शैक्षणिक वाटचाल सुखकर करण्यासाठी आपण त्यांना मोफत सायकल देण्याचा निर्णय घेतला, ही खूप मोलाची गोष्ट आहे. तसेच तेवढ्यावर न थांबता आपण काही अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक व मोफत शालेय खर्च हाही उपक्रम राबवित आहात, याचा मला अतिशय आनंद होत आहे. सामाजिक बांधिलकीला कृतीची जोड दिली की, असे लोकोपयोगी उपक्रम यशस्वी होतात. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांना आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वाढदिवसाचं औचित्य साधून प्रमोद काका जगताप मित्र परिवार आणि युगेंद्रदादा पवार विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याबद्दल आयोजकांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, आयोजक प्रमोद काका जगताप, श्रीकांत तावरे पाटील, राजेंद्र बापू जगताप, माजी नगरसेवक सुरज सातव, धनराज निंबाळकर, किशोर गायकवाड, विठ्ठल खरात, शुभम गाडेकर, अक्षय जगताप, लखन साळवे, भोसले साहेब, अक्षय कांबळे ( कटफळ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा वनिताताई बनकर, शहर अध्यक्षा आरती गव्हाळे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post