पोलीस स्टेशनवर जमावाची दगडफेक
तर पोलिसांचा नागरिकांवर लाठी चार्ज
चिमूर प्रतिनिधी समीर बल्की
चिमूर :- चिमूर शहरातील एकाच वार्डातील 13 आणि 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणींवर दोन नराधमांनी बऱ्याच दिवसापासून अत्याचार केल्याची घटना काल सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी उघडकीस आली. या दोन्ही मैत्रिणी सोबत शिक्षण घेत असून शेजारी राहत असल्याने घरासमोर नेहमी खेळायच्या. काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास तेरा वर्षीय मुलीने घरी बसून असताना आपल्या आईला दोघींसोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. मार्च महिन्यात दोघी मैत्रिणी दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मोहल्लामधीलच आरोपी रशीद रुस्तम शेख व नाशिर वजीर शेख या दोघांनी खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अत्याचार केला. माणुसकीला काडीमा फासणारा हा प्रकार दोन्ही नराधम आरोपीकडून खाऊ देण्याच्या बहाण्याने माहे सप्टेंबर महिन्यापासून या अल्पवयीन मुलींवर वारंवार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तेरा वर्षाच्या मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चिमूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली व आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच रात्री अकरा वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला घेराव घातला. व आरोपीवर कठोर कारवाई करण्याची, अन्यथा आरोपीला आमच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात एक महिला पोलीस व एक पोलीस जखमी झाले. त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आली आहे.पोलीस स्टेशन समोर वाढता जमाव लक्षात घेता ठाणेदार बागल यांनी भिशी, नागभीड, शेगाव येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली. व जमावाला पांगवण्याकरिता नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे जमावाचा रोस बघता आरोपींनी पोलीस ठाण्यात शरण घेतले.
तब्बल चार तास जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. नागरिकांवर लाटीच्या झाल्याची माहिती शहरात पोहोचताच 500 ते 600 नागरिकांचा जमाव पोलीस स्टेशन समोर आला. त्यानंतर पोलिसांच्या लाठीचार्ज चा निषेध करून पोलीस स्टेशन समोर टायरची जाडपोड करण्यात येऊन रोस व्यक्त करण्यात आला. त्यामुळे प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली.
दरम्यान पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक हे विविध पथकासोबत पहाटे तीन च्या सुमारास पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. व दंगा नियंत्रण पथक सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याने चोख बंदोबस्त पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. दंगा नियंत्रण पथकाने परिस्थिती हाताळल्याने तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली.आज मंगळवार ला सकाळी चिमूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले असून तणावपूर्ण शांतता आहे. तसेच आरोपी व पीडितांच्या घराशेजारी व शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Discussion about this post