
ता.प्र.मारोती काळेकर. दिनांक 14/4/2025 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती अत्यंत उत्साहात व अभिमान पुर्वक साजरी करण्यात आली. संविधान निर्माते थोर समाजसुधारक आणि मानव अधिकारांचे अग्रदूत म्हणुन ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आज विविध उपकारांच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. सकाळी 9 वाजता बुद्ध विहारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार
भाग्येशील वानखडे, राजेंद्र माहुरे, नरेश खडसे, कुंदन बळगे, संदीप माहुरे, प्रकाशराव इंगोले, मनोहरराव घोडेस्वार, ज्ञानेश्वर वाघमारे, दीपकराव गेडाम, प्रभाकर अबुरे, रमेश कांबळे, अविनाश कुबलकर, यांनी पुजन करुन पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
समता बंधुता व न्याय यांचे स्वप्नं साकार करण्यासाठी आपण बाबासाहेबांच्या विचारांचे अणुकरन करनै आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे केवळ एक स्मरणदीन नसुन सामाजिक समतेचा संकल्प पुन्हा नव्याने जागवण्याची प्रेरणा देणारा दिवस ठरतो असे मत समाजातुन व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळच्या वेळी गावातुन भव्य प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र ठेऊन शोभायात्रा काढण्यात आली. सोभा यात्रेचे ठिकठिकाणी थंड पाणी व शरब देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी कंझरा येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांनी प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील बिटजंमदार निकोसे होमगार्ड पोलिस पाटील सौ. माधुरीताई बाबुळकर तंटा मुक्ती अध्यक्ष श्री. सचिनभाऊ घेवारे शेख रईस शेख नादर तसेच गावातील मान्येवर नागरिक उपस्थित होते.
वृतांत तालुका प्रतिनिधी,नांदगाव खंडेश्वर..
Discussion about this post