


दिवा ठाणे :
उधरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे !
क्रांतिसूर्य, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त दिवा शहरात उत्सव मिरवणूक मोठ्या जोषात काढण्यात आली.
मिरवणुकीची सुरुवात जयभीम स्तंभ साबे रोड दिवा रेल्वे स्टेशन पासून मुब्रांदेवी कॉलनी रोड ते दातीवलीरोड पुढे दिवा पोलिस चौकी, ग्लोबल स्कूल दातीवली तलाव ते सम्यक बुद्ध विहार गणेश नगर येथून वळून बी.आर.नगर मार्ग सिद्धार्थ बुद्ध विहार येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीत सर्व भिमसैनीक, समाज बांधव सहपरिवार उपस्थीत होते.
व लहान थोर डीजेच्या गजरात भिम गीतावर नाचून त्याचा आनंद वक्त करत होते.
दिवा पोलीस चोकी जवळ ग्लोबल स्कूल समोर बहुजन समाज पार्टी कल्याण ग्रामीण विधानसभा तर्फे कार्यकर्त्यांनी मिरवणुकीतील भिमसैनिकांना पावभाजी व पिण्याचे पाणी वाटप केले.
पावभाजी व पिण्याचे पाणी वाटप करताना बहुजन समाज पार्टीचे कल्याण विधान सभा अध्यक्ष मा. दीपक भाऊ खदारे, कोषाध्यक्ष प्रशांत विनकरे,दातीवली सेक्टर उपाध्यक्ष मा.नागेश गमरे, अपर्णा ताई सकपाळ, विकास पोहरकर, ओमकार महामुनी, जयंतराव, बबन म्हात्रे,संजय हीरलेकर, राकेश कोरी, पंकज गौतम, दर्शन खंदारे, प्रेम गमरे, संगीता जाधव, कृष्णा जैस्वाल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post