
शिरुर तालुका प्रतिनिधी:- सारथी महाराष्ट्राचा
शिरूर,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची नागरीकांना महत्त्वपूर्ण सूचना
पुणे ग्रामीणमधील शिरूर पोलीस स्टेशनमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्याही फसव्या योजना, लोकांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. पुढील मुद्द्यांवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे:
१. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींवर अंधविश्वास नको. बाहेरील जिल्ह्यांतून किंवा राज्यांतून आलेल्या नवख्या व्यक्तींवर विश्वास ठेवून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये.
२. प्रलोभनांना बळी पडू नका. कोणीही व्यक्ती, संस्था, एजंट गुंतवणुकीसाठी आकर्षक प्रलोभने देत असतील, तरी त्यावर विश्वास ठेवू नका.
३. शेअर मार्केटमध्ये सजग गुंतवणूक करा.केवळ स्वतःला पुरेशी माहिती असल्यासच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी.
४. क्रिप्टो करन्सी गुंतवणूक टाळा. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना भारत सरकार व रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
५. अवास्तव व्याजाचे आमिष – सावधान..! काही कंपन्या तुमच्या गुंतवणुकीवर अवास्तव व्याजआणि देण्याचे वचन देतात. अशा कंपन्या काही काळ व्यवहार करून अचानक गायब होतात.
६. चेन मार्केटिंग पासून सावध राहा.तीन गुंतवणूकदार आणल्यास कमीशन मिळेल, असे सांगणाऱ्या कंपन्यांना टाळा. अशा योजना अल्पावधीत कोसळतात.
७. कंपनी नोंदणी व परवाना तपासा.कोणत्याही खाजगी कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ती कंपनी अधिकृत आहे की नाही, याची खातरजमा करावी.
८. अधिक परतावा म्हणजे धोका..! जास्त परताव्याचे आमिष म्हणजेच अधिक धोका. सावध राहा.
९. पतसंस्था / सहकारी बँका तपासूनच गुंतवणूक करा.पतसंस्थांचा ऑडिट रिपोर्ट व आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता तपासावी.
१०. बँक खाती वापरण्यास देऊ नका.आपले बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नये. याचा गैरवापर होऊ शकतो.
११. केवळ मान्यताप्राप्त संस्थांमध्ये गुंतवणूक करा.राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस, सेबी व आरबीआय मान्य संस्थांमध्येच गुंतवणूक करावी.
१२. भिसी योजना – अधिकृत नसलेल्या गुंतवणुका टाळा.भिसी, लिलाव भिसी यामध्ये पूर्वी फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत.१३. ओटीपी, आधार, पॅन क्रमांक – कोणालाही देऊ नका.फोनवरून कोणतीही माहिती मागितली तरी ती देऊ नका.
१४. जमीन खरेदीपूर्वी सत्यापन आवश्यक.जमीन व्यवहार करताना विक्रेता खरा मालक आहे की नाही, याची खात्री करावी. सर्व कागदपत्रे, रिपोर्ट तपासावेत.
१५. व्यवहार केवळ चेक/RTGS द्वारा करा.रोकड व्यवहार टाळावेत. व्यवहारांचे पुरावे आवश्यक आहेत.
१६. अधिकृत कराराशिवाय व्यवहार टाळा.कोणताही आर्थिक व्यवहार लेखी कराराशिवाय करू नये.
१७. खोट्या नोकरीच्या आश्वासनांना बळी पडू नका नोकरी लावतो म्हणून पैसे घेणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा.
१८. जमीन गुंतवणुकीसाठी सर्च रिपोर्ट आवश्यक.जमीन खरेदीपूर्वी वकीलामार्फत सर्च रिपोर्ट काढून खात्री करावी.
१९. जमीन प्लॉटिंगमध्ये सावधगिरी बाळगा.राज्यात तुकडाबंदी कायदा लागू आहे. केवळ कलेक्टर एन.ए. असलेली प्लॉटच खरेदी करा.
संपर्क:
शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
दूरध्वनी क्रमांक: +91 74999 39099
ई-मेल: pishirur.pnr@mahapolice.gov.in
जर आपणास अशा फसवणूक प्रकारांची माहिती मिळाल्यास, कृपया तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
“सतर्क नागरीक, सुरक्षित समाज!”
Discussion about this post