भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती राहेरी बु, ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली
सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी बु, ग्रामपंचायत कार्यालयमध्ये 14 एप्रिल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सरपंच पती बालाजी देशमुख यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.जोर से बोलो जय भिम गजर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच कोकीळा ताई गवई ,सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच प्रमुख उपस्थिती ,डॉ. साहेब , साहेबराव गवई,आनिल गवई, गावातील बौद्ध उपासक बौद्ध उपासिका प्रामुख्याने हजर होते
Discussion about this post