
खर्डी : प्रकाश जाधव
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दशरथ चव्हाण यांची काल संघटनेचे प्रांतिक सरचिटणीस विश्वास आरोटे व कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करून नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार गेल्या सात वर्षांपासून दशरथ चव्हाण यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे.
पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुका प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांच्या हस्ते दशरथ चव्हाण यांचा सत्कार करून त्यांना नवी मुंबई अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले व अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post