श्रीगोंदा , श्रीरंग साळवे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील विद्यावाचस्पती पदवी, श्रीगोंदा येथील रहिवाशी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले संदीप मोटे यांना '1990 नंतरच्या ग्रामीण कादंबऱ्यांतील सामाजिक जीवनाचा अभ्यास.' या विषयातील संशोधणासाठी देण्यात आली.
पुणे विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख .डॉ.तुकाराम रोंगटे यांचे अध्यक्षतेखाली व अमरावती येथील बाह्यपरीक्षक .डॉ. संजय लोहकरे , मार्गदर्शक .डॉ. राजेंद्र ठाकरे , अभ्यासमंडळाचे अध्यक्ष .डॉ.संदीप सांगळे , .डॉ.सुधाकर शेलार , यांच्यासह प्राध्यापक, अभ्यासक व संशोधक यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे मोटे यांची मुलाखत झाली. सुमारे दीड तास चाललेल्या मुलाखतीत यावेळी नव्वदोत्तरीय ग्रामीण जीवनातील बदल, समस्या व उपाय नोंदविण्यात आले.
जिल्हा प्राथ.शिक्षक बँकेचे चेअरमन राहिलेले व विद्यमान संचालक असलेले संदीप मोटे हे यापूर्वीच मराठी व शिक्षणशास्त्र या दोन्ही विषयात नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मोटे यांच्या या यशाबद्दल डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते .बापूसाहेब तांबे, डॉ.देविदास शेटे, .कुंडलिक शिर्के , जिल्हाध्यक्ष .बबन गाडेकर, गटशिक्षणाधिकारी .सत्यजित मच्छिन्द्र , विस्तार अधिकारी .निळकंठ बोरुडे ,
.सुनीता वाजे मॅडम, .सीताराम भुजबळ , तालुका अध्यक्ष संदीप होले , सिद्धार्थनगर-ससाणेनगर येथील पालक, सर्व शिक्षक संघटनेतील मित्र परिवार, शिक्षक बँक संचालक, कर्मचारी व सभासद यांनी मोटे यांचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Discussion about this post