
- प्रतिनिधी केज नांदुर घाट :-
- भूमी कन्येच्या जन्मानंतर तिच्या नावे पाच हजाराची एफडी, करण्याचा तसेच दहावी बारावीतील पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोग बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामसभेत घेण्यात आला, येथील सरपंच अॅड, नितीन मेटे यांनीही माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी राजेगाव येथे ग्रामसभा झाली. अध्यक्ष स्थानि सरपंच अॅड. नितीन मेटे होते. यावेळी राजेगाव येथे जन्मलेल्या व ग्रामपंचायतीच्या जन्म नोंद रजिस्टरला अधिकृत नोंद झालेल्या मुलीच्या नावे पाच हजार रुपये पोस्ट कार्यालयात कायम ठेव ठेव ण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दहावी बारावी परीक्षेत राजेगाव या गावातून जो विद्यार्थी प्रथम क्रमांक वर येईल, त्या विद्यार्थ्याला माजी सरपंच स्वर्गीय नारायणराव मेटे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, व बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला लोकनेते स्वर्गीय विनायक रावजी मेटे यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये, पारितोषिक देऊन सन्मान करण्याची घोषणा ही यावेळी करण्यात आली. यासंबंधीचे ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. अशी माहिती सरपंच अॅड. नितीन मेटे यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली. त्यावेळेस तेथील उपस्थित गावकरी तसेच ग्रामविकास अधिकारी यादव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,हे हजर होते. व याचा आदर्श नांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल मधील ग्रामपंचायत घेतील असा विश्वास राजे गावचे सरपंच यांनी दिला..
Discussion about this post