भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी -कल्याण सोन्नर
9921779668
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात आज चंदन उटीचा विशेष लेप करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती लाभली.
प्राचीन परंपरेनुसार उष्णतेपासून गणपती बाप्पाला शीतलता मिळावी यासाठी चंदन उटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदन उटीचा सुगंधी थर लावण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झाला.
मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष सजावट करण्यात आली होती. भक्तांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था, तसेच चंदन लेपाच्या दर्शनासाठी ऑनलाइन थेट प्रक्षेपणाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मंदिराचे मुख्य पुजारी व ग्रामस्थ यांनी सांगितले की, “ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि दरवर्षी यामध्ये भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो.”
चंदन उटीचा लेप झाल्यानंतर मंदिरात महापूजा, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पवित्रतेने भरले होते.
Discussion about this post