Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतील बनावट कॉलला बळी पडू नका; महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

Avishkar Bobade by Avishkar Bobade
May 2, 2025
in ताज्या घडामोडी, शेतीवाडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

शिरोळ तालुका प्रतिनिधी:

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येत आहेत. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नाही. शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते. यादीनुसारच पंप बसविण्यात येत आहेत.



मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट कॉल आले, तर शेतकऱ्यांनी त्याबाबत महावितरणच्या 1800 233 3435 अथवा 1800 212 3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंका निरसन करता येईल.
या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते.अनुसूचित जाती – जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ पंपाचे बिल येत नाही. तसेच दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते.राज्य सरकारने जाहीर केलेली ही योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरात लवकर पंप बसविण्यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.



साहित्याची मागणी चुकीची

शेतात सौर कृषी पंप बसविताना काही ठिकाणी संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च अथवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्याही तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. परंतु सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये व महावितरणकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Tatyasaheb Shirgave
Send
Previous Post

मजुळाबाई गणपती डुबुकवाड याचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

Next Post

रावेरी मंदिरात ‘सीतानवमी महोत्सव’ — सात महिलांना ‘स्वयंसिद्धा सीता पुरस्कार’

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
रावेरी मंदिरात ‘सीतानवमी महोत्सव’ — सात महिलांना ‘स्वयंसिद्धा सीता पुरस्कार’

रावेरी मंदिरात ‘सीतानवमी महोत्सव’ — सात महिलांना ‘स्वयंसिद्धा सीता पुरस्कार’

जयवंतराव शिंपी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त स्नेहपुर्ण शुभेच्छा भेट!

जयवंतराव शिंपी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त स्नेहपुर्ण शुभेच्छा भेट!

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com