पांडुरंग जगताप तालुका प्रतिनिधी, किल्ले धारूर
शेकडो महिलांचा अनेक दिवसा पासुन सतत राम जप
धारूर : तालुक्यातील घागरवाडा येथे दि.०८/०५/२०२५ गुरुवार रोजी सायं. ०६ वाजता लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बीड जिल्हयातील व मराठवाड्यातील वाचक सूचक मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन घागरवाडा ग्रामस्थांनी केले आहे.
घागरवाडा येथील लक्ष्मण शक्ती कार्यक्रमात शेकडो महिलांकडून गेल्या अनेक दिवसा पासुन सतत राम जप करण्यात आला. राम जप करऱ्या महिलासाठी गावंदरा येथील संभाजी पंढरीनाथ बडे यांच्या कडून सन्मान पुर्वंक साडीचोळीचा आहेर भेट देण्यात आला, तसेच घागरवाडा येथील महिलांन कडून सर्व बडे कुटुंबाला कपड्याचा आहेर हि करण्यात आला. किल्ले धारूर तालुक्यातील बालाघाट डोंगर पर्वंत रांगेतील घागरवाडा येथे गोपाळबाबा देवस्थान या ठिकाणी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भावार्थ रामायण कथा चालू आहे.
संपूर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात कांड असून यामध्ये बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किन्धाकाण्ड, सुंदरकाण्ड, लंकाकाण्ड (लक्ष्मण शक्ती) उत्तरकाण्ड, असे एकूण सात काण्ड आहेत. यापैकी बालकाण्ड, अयोध्याकाण्ड,अरण्यकाण्ड ,किष्किन्धाकाण्ड, सुंदरकाण्ड हे पूर्ण झाले असून आता युद्धकाण्डा मध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा आयोजनाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे.
या भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम दि.८/०५/२०२५ गुरुवार रोजी सायं ०६ वाजता सुरु होणार असुन शुक्रवार दि.०९ रोजी सकाळी ०६ वाजता लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाची समाप्ती होणार असून ग्रामस्थाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या लक्ष्मण शक्ती कार्यक्रमासाठी बीड जिल्हयातील व मराठवाडयातील वाचक सुचक व भाविक भक्तांनी उपस्थीत राहाण्याचे आवाहन घागरवाडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post