(प्रतिनिधी) नांदुर घाट केज:- भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांचा 13 मे रोजी वाढदिवस असून त्या निमित्ताने अंबाजोगाई शहरात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘मराठी पाऊल पढते पुढे’ यांचा समावेश असून अंबाजोगाई शहर तथा पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे व युवक कार्यकर्ते अमोल पवार यांनी केले आहे.
दरम्यान कार्यक्रमाच्या पुर्व तयारीसाठी ‘अक्षय’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक होवुन विविध समित्या वाटप करण्यात आल्या आहेत. हा भव्य कार्यक्रम शहरातील मध्यभागी असलेल्या सेंट ऍंन्थोनी स्कुलच्या मैदानावर घेतला जात असून व्यवस्थेतील प्रमुख पदाधिकार्यांनी त्या दृष्टीने मैदानाची काल पहाणी करीत रचना केली आहे. युवा नेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस तसं पहाता मोठ्या प्रमाणात साजरा करणे हे त्यांना स्वत:च मान्य नसते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व प्रेमापोटी यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविल्याचे संजय गंभीरे व अमोल पवार यांनी सांगितले. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम विनोदी म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, सागर करांडे, कुशाल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आदींचा समावेश आहे. मागच्या दहा वर्षांपासुन हा कार्यक्रम खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात जावून पोहोचलेला असून तो पहाण्यासाठी लोकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर वाढते.
‘झी मराठी’च्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणावर रसिक कार्यक्रम पहातात. विनोदाची जुगलबंदी, मराठी गाण्यातून विनोदी विडंबन, वेगवेगळ्या वेशभुषेत कलाकारांची तुफान कॉमेडी याचे आकर्षण रसिकांना असते. ‘थुकरटवाडी’ हा त्यांचा विशेष कार्यक्रम गाजला असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात त्यांचे दौरे असतात. दरम्यान याच दिवशी ‘मराठी पाऊल पढते पुढे’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम देखील होणार असल्याचे ही संयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाची शहरात जय्यत तयारी सुरू झाली. प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अक्षय’ निवासस्थानी बुधवार, दिनांक ७ मे रोजी घेण्यात आली. त्या बैठकीत कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा आणि त्यासाठी समित्यांची रचना करून प्रमुख पदाधिकार्यांना विविध जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले. शहरात सेंट ऍंन्थोनी शाळेचे भव्य मैदान असून या ठिकाणी किमान सहा हजार रसिक-श्रोते यांना बसण्याची व्यवस्था तसेच अद्ययावत व्यासपीठ असणार आहे. सांस्कृतिक वारसा तथा साहित्य रसिकांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या शहरात ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘मराठी पाऊल पढते पुढे’ हे दोन भव्य कार्यक्रम होणार असल्याने रसिकांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या तरी कार्यक्रमाची शहरात जोरदार तयारी सुरू असल्याचे लक्षात येते.
या मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.सौ.नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री शहरात आणि मतदारसंघात घेवून येण्यासाठी शासकिय पातळीवर पाठपुरावा करण्यात स्वत: अक्षय मुंदडांचा सिंहाचा वाटा असुन त्यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासात आमुलाग्र बदल झाल्याचे लक्षात येत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या कोनाकोपर्यातील रस्ते दर्जेदार सुमार झाल्याने सर्वत्र लोकांच्या मनातुन मुंदडा कुटुंबियांच्या बाबतीत कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. या कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे व अमोल पवार यांनी केले आहे…
Discussion about this post