कंधार :
लोहा येथील माजी नगरसेवकाच्या विरोधात नाभिक संघटना कंधारच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत तहसील कार्यालय कंधार येथे निवेदन दिले.
लोहा येथील साई जेन्टस पार्लरचे मालक श्री संभाजी ज्ञानोचा श्रीमंगले यांचा सलूनचा व्यवसाय आहे, त्यांचा यावर उदारनीर्वाह चालतो. दि. 4 मे रोजी, रविवारी काम करत होते. ठिक दुपारी 1 वाजता लोहा येथील माजी नगरसेवक रमेश माळी हे तिथे आले आणि माझी कटिंग दाढी कर म्हणत दमदाटी केली. त्यावेळेस संभाजी श्रीमंगले यांनी त्यांची समजूत काढत थोडा वेळ लागेल असे सांगितले पण रमेश माळी यांनी काही न ऐकता शिविगाळ देण्यास सुरुवात केली व पुढे दुकान बंद करण्याची धमकीही दिली. यामुळे ते चांगलेच बिथरले व त्यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. ही घटना नाभिक संघटना कंधार येथील व्यक्तींना कळाल्याने त्यांनी झालेल्या घटनेचा निषेध करत दि. 8 मे रोजी, गुरुवारी सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालय कंधार येथे तहसीलदारांना तात्काळ अटक व्हावी यासाठी निवेदन दिले. त्यावेळेस नाभिक संघटना तालुकाध्यक्ष शिवशंकर सावरकर, प्रभाकर श्रीमंगले, प्रकाश श्रीमंगले, नागनाथ माधव श्रीमंगले, राजीव श्रीमंगले, पंडित श्रीमंगले, तिरुपती सावरकर, राम राजगिरे व इतर नाभिक संघटनेतील सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post