प्रतिनिधी – सगीर शेख, शहापूर तालुका
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत आवरे अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) यांच्या 2023-24 वर्षातील विविध विकास निधीअंतर्गत मंजूर कामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
या लोकार्पण सोहळ्यात जांभूळपाडा रस्ता तयार करणे व समाजमंदिराचे बांधकाम या दोन महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश होता. हा कार्यक्रम आमदार साहेब तसेच तहसीलदार श्री. परमेश्वर कासुळे यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, चेरपोलीचे माजी उपसरपंच जगदीश पवार, उपसरपंच अविनाश किरपण, संजय सुरळके, ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ वाघ, उपसरपंच अंजना घरत, तसेच सदस्य संदीप किरपण, दत्ता हिंदोळे, गुलाब भले, सखाराम शिंगे, मंगळ कडव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे यथोचित स्वागत करून आभार व्यक्त केले. या विकास कामांमुळे गावाच्या प्रगतीस नवे बळ मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Discussion about this post