प्रतिनिधी – सुरज काकडे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदळ वय 75 या वृद्ध महिलेची हत्या करून गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचे कारण अद्याप माहिती झालेली नाही मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दराडे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव ,हरीश भोये पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले अमोल मुटकुल संभाजी कुसळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम. फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ञ रशीद शेख. सोनपत का सह मोठा पोलीस फौजफाटा तेथे दाखल झाला.
नेमकं काय घडलं? घटनास्थळी तपास करत असताना मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत म्हणून ही हत्या केवळ चोरीसाठी झालेले नाही असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या कोणी केली ?हत्या करणे मागे नेमके कारण काय आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत मात्र या घटनेने अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण असल्याची माहिती मिळते. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत
Discussion about this post