चि कवी सम्राट समाधान हनुमान
दैनिक सारथी महाराष्ट्राचा पत्रकार
लोकार्पण
गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री #विजयसिंह_पंडित साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून गेवराई आगारासाठी ५ नवीन “लालपरी” बस उपलब्ध करून देण्यात आल्या. आज गेवराई आगारामध्ये आ.मा श्री विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते लालपरी चे विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आल्या.
येथील बसस्थानक परिसरात बऱ्याच दिवसांपासून प्रवाशांच्या सेवेसाठी या लालपरीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती यावेळी परिपूर्ण झाली गेवराई अगराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, माजी नगरसेवक शाम येवले, गोरखनाथ शिंदे, दत्ता दाभाडे, मोहसीन भगवान, बाबा शेख , संदिप मडके, वचिष्ट काळे, आगर प्रमुख एल. बी. मस्के, बसस्थानक प्रमुख तुळजीराम कालीके, वाहतूक निरीक्षक संजय कदम, ज्ञानेश्वर चातुर,कामगार संघटनेचे अध्यक्ष सुयोग दाभाडे, कचरू पंडित, बाळू बडे, बाळू मराडे, बबन वडमारे, रघुनाथ खेडकर, निशिकांत शिंदे, दाताळ, कोकाटे, सचिन जायभाये आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आगारातील वाहक, चालक व सर्व प्रवासी उपस्थित आणि कर्मचारी बांधव उपस्थित होते.
Discussion about this post