आज सांगली मिरजेसह पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आणि जगभरातील असंख्य कर्क रोग ग्रस्त रुग्णांचे आशास्थान असलेले आणि कै डॉ डी के गोसावी आणि काई डॉ प्रभाताई गोसावी यांनी लावलेले सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल हे २७ vya वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त एका खास कार्यक्रमामध्ये आयुक्त सत्यम गांधी याना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रितय करण्यात आले होते त्यावेळी आयुक्त सत्यम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले, ‘गेल्या २७ वर्षांमध्ये सिद्धिविनायक गणपती कॅन्सर रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ नी मनोभावे केलेल्या रुग्णसेवेने माणुसकीचे जतन केले आहे त्याचबरोबर या रुग्णालयाने सांगली मिरजेचे नाव देशपातळीवर नेले आहे. आज या रुग्णालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मला या ठिकाणी आमंत्रित केले गेले त्याबद्दल मी रुग्णालयाच्या मॅनेजमेंट कमिटीचे आभार मानतो. अशीच रुग्ण सेवा आपल्या रुग्णालयाकडून भविष्यातही घडो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो’
यावेळी रुग्णालयाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ शिशिर गोसावी म्हणाले २७ वर्षांपूर्वी लावलेले इवलेसे हे रोपटे आज जगभरातील रुग्णांना दिलासा देत आहे हि आम्हा सर्वाना अभिमानाची बाब आहे आज आम्ही सर्व कुटुंबीय येथील स्टाफ तज्ज्ञ डॉक्टर्स कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या सेवेत तत्पर आहोतच तसेच विविध अत्याधुनिक यंत्रणांसह आम्ही सज्ज आहोत. यावेळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील तज्ज्ञ धन्वंतरी डॉ विनोद परमशेट्टी यांच्यासह डॉ राहुल गोसावी सारंग गोसावी डॉ अमिता गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post