गडहिंग्लज ते नागनवाडी पुलासाठी ४० कोटी मंजूर खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या विशेष प्रयत्न
आजरा: प्रतिनिधी,
खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र शासनाच्या रस्ते,वाहतूक, महामार्ग मंत्रालयाकडून केंद्रीय मार्ग निधीतून
गडहिंग्लज ते नागनवाडी पुलासाठी ४० कोटी मंजूर झाले आहेत.
आज शनिवार दि. 10 मे रोजी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या पुलास प्रत्यक्ष भेट दिली आणि पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून होणाऱ्या कामाची माहिती घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे व्ही. बी. पाटील, अमर चव्हाण, दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post