
प्रतिनिधी: राजेंद्र टोपले , सुरगाणा
जि.प.प्राथ.शाळा तोरणडोंगरी ता.सुरगाणा या शाळेमध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर चौधरी होते. शाळेतील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी खूप उत्साही होते. शाळेमध्ये सकाळी शाळेतील शिक्षक श्रीकांत गवळी यांनी योगाविषयीची माहिती दिली तसेच श्री रामदास भोये यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवत विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. योगाचा इतिहास व जीवनातील उपयोगिता कथन करताना योगाच्या माध्यमातुन आपण स्वतःला कसे निरोगी व आनंदी ठेवू शकतो याविषयीची सविस्तर माहिती पंडित गायवन यांनी दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर चौधरी,शिक्षक पंडित गायवन,पुंडलिक चौधरी,रामदास भोये,श्रीकांत गवळी,मनोहर भोये,गणेश पाडवी व शाळेतील विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.