
प्रतिनिधी|विनोद तायडे | सारथी महाराष्ट्राचा
भडगाव | २३/०६/२०२५
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. सत्यजित दादा तांबे हे 22 जून 2025 रोजी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भडगाव शहरात आले. यावेळी त्यांनी वेटरन अकॅडमी ला सदिच्छा भेट देत तेथील संचालक शी संवाद साधला आणि अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी जयहिंद लोकचळवळ, भडगाव पदाधिकाऱ्यांशी विशेष चर्चा केली. सामाजिक कार्य, युवक विकास आणि भडगाव शहराच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांना जयहिंद लोकचळवळच्या व वेटरन अकॅडमी च्या वतीने प्रेरणादायी पुस्तक आणि स्मरणीय प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. या भेटीत जयहिंद लोकचळवळ भडगाव समन्वयक अशुतोषकुमार पाटील, भूषण पवार, श्रेयस कासार, चेतन सोनवणे, कुणाल निकम, रोहित देशमुख, यश महाजन, कपिल पाटील तसेच माजी नगरसेविका योजना ताई पाटील मान्यवर उपस्थित होते. आमदार तांबे यांनी भडगावातील युवकांच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यात सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक त्या सहकार्याचे आश्वासन दिले.