अमरावती| 29 जून 2025 – अमरावती शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सकाळी त्यांच्या ड्युटीवर जात असताना घडली.
प्राप्त माहितीनुसार, ASI अब्दुल कलाम हे दुचाकीवरून जात असताना त्यांना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहनातून उतरलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर पोट व छातीवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने बेस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, पोलीस दलातही शोककळा पसरली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नावे फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22), आणि आवेज खान अयुब खान (वय 22) अशी आहेत.
पोलीस तपासात उघड झाले आहे की, हल्लेखोरांनी ही हत्या अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे हे पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व शक्य कोनातून तपास सुरू केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, पोलीस दल व विविध संघटनांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासात गती देण्याचे निर्देश दिले आहेत. व पुढील तपास सुरू आहे.