महायुतीला शेतकऱ्यांचा ठाम पाठिंबा – एकहाती सत्ता मिळवत १५ जागांवर वर्चस्व
जोगेंद्र जाधव कल्याण तालुका ग्रामीण प्रतिनिधी
कल्याण, दि.२९ :कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश संपादन करत एकहाती सत्ता मिळवली आहे. एकूण १८ जागांपैकी तब्बल १५ जागा महायुतीने जिंकल्या असून, विकास आघाडीला केवळ २ जागा आणि अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली आहे.
मतदारांनी महायुतीच्या पारदर्शक धोरणांवर आणि शेतकऱ्यांच्या हितकारक कामगिरीवर आपला विश्वास दाखवत मतदानाचा कौल स्पष्टपणे दिला आहे. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून शेतकरी वर्गाच्या अपेक्षांचं आणि विश्वासाचं फलित आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सशक्त निर्णय घेण्याची,
बाजारभावात पारदर्शकता आणण्याची आणि कृषी विकासाला गती देण्याची जबाबदारी आता महायुतीच्या नेतृत्वावर आहे. या दणदणीत विजयानंतर कल्याण परिसरात कार्यकर्त्यांत आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि भविष्यातील अपेक्षांची झलक दिसून येत आहे.
महायुतीने या विश्वासाला योग्य ठरवत कामगिरी करावी, हीच शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.