आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय भुलेगाव, ता. येवला येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फेरीत सहभाग घेतला. ‘विठ्ठल-विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ अशा गजरांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारले.
दिंडी फेरीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापक श्री रामभाऊ सयाजी उंडे, क्रीडा शिक्षक श्री पंडित देवरे, तसेच श्री कैलास सोनवणे, श्री ज्ञानेश्वर पुणे, श्री बाळासाहेब मोरे, शिक्षकेत्तर कर्मचारी गायकवाड सर, मोरे सर यांनी सहभाग घेतला.
या वेळी विद्यार्थ्यांनी फुगडी, टाळ-मृदंगाच्या तालावर नृत्य सादर केले. दिंडी सुरू करण्यापूर्वी शाळेच्या प्रांगणात विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री प्रकाशराव कोल्हे सर यांची उपस्थिती लाभली.
संस्था – अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ, येवला यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक मूल्यांची जपणूक करत विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे बीज रोवणारा हा सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.