श्री अजित तोडकर आजरा हायस्कूलचे नूतन मुख्याध्यापक
श्री अजित तोडकर यांची आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी नेमणूक झाली आहे.जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अशोक अण्णा चराटी व सर्व संचालक मंडळ यांनी ही नेमणूक केली आहे. श्री अजित तोडकर सर हे गणित विषयाचे उत्तम अध्यापक आहेत तसेच त्यांनी एन.सी.सी ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद आहेत. या त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे सौ हेमलता कामत यांची उपमुख्याध्यापक पदी बढती झाली असून श्री आनंद व्हसकोटी यांची पर्यवेक्षक पदी नेमणूक झाली आहे.