उमरगा प्रतिनिधी : राहुल थोरात
जि. प प्रा शाळा व स्वामी विवेकानंद विद्यालय त्रिकोळी च्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त दोन्ही शाळेचे विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समिती, भजनी मंडळ यांनी दिमाखदार ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात पार पडला. मराठी शाळा व जिल्हा परिषद शाळेवषयी विद्यार्थी व पालक वर्गामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असून, शाळेविषयी प्रेम, आदराची भावना निर्माण करण्यासाठी असे अनेक उपक्रम दोन्ही शाळा वर्षभरामध्ये राबवत असतात. पालकांची व शिक्षण प्रेमीची मोलाची साथ कायम शाळेला मिळत असते.. आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या ग्रंथदिंडी पालखी सोहळ्याला गावकर्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून पूर्ण गाव विठ्ठल नाम घेत टाळ मृदुगांच्या गजरात तल्लीन होऊन गेला..


या पालखी सोहळ्यासाठी उद्योजक हणमंत इंगळे व सेवानिवृत्त मेजर नागनाथ तेलंग यांनी महाप्रसाद वाटप केला असून, जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी उद्योजक हणमंत मनोहर इंगळे यांनी 51000/- रुपये व विवेकानंद बिराजदार यांनी शाळेचे रंगकाम करण्यासाठी 11000/- रुपये तात्काळ जाहीर केले तसेच इतर शिक्षण प्रेमी मिळून या सोहळ्यानिमित्त एकूण 77852/- रुपयेची देणगी शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी जाहीर झाली… या ग्रंथ दिंडी सोहळ्यामध्ये मुख्य आकर्षण ठरलेले विठ्ठल(कार्तिकी बाळू बिरादार) रुक्मिनी(रुद्रायणी शिवदर्शन पाटील) जगदगुरू संत तुकाराम महाराज ( समर्थ नागनाथ इंगळे) यांनी वेशभूषा केली होती. दोन्ही शाळेचे विद्यार्थी, पालक शिक्षण प्रेमी मोठ्या उत्साहात हा सोहळा पाहण्यासाठी हजर होते. हा सोहळा पार पाडण्यासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय समिती, शिक्षण प्रेमी पालकांनी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले व उपस्थित सर्वांचे शाळेच्या वतीने श्री सुनील गायकवाड सर यांनी आभार मांडले..