• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारोळ्याच्या लेकीची इस्रोपर्यंत झेप; धनश्री काशिदला विमान प्रवासाची संधी!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
सारोळ्याच्या लेकीची इस्रोपर्यंत झेप; धनश्री काशिदला विमान प्रवासाची संधी!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा निवड चाचणीत सातवी-आठवी गटातून प्रथम क्रमांक; थुंबा येथील डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरला देणार भेट

जामखेड | प्रतिनिधी

RelatedPosts

करमाळ्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन; ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

दख्खन धनगरवाडीत दसरा उत्साहात साजरा; धनगरी गजा, गरबा अन् बाळ्या डान्सने रंगला सोहळा!

भुदरगड तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सारोळा गावच्या धनश्री अनिल काशिद हिने जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा निवड चाचणीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक), अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा २०२६ मध्ये सातवी-आठवी गटातून प्रथम क्रमांक मिळवत तिने इस्रो सहलीसाठी निवड होण्याचा मान पटकावला आहे. या यशामुळे धनश्रीला विमान प्रवासाची संधी मिळणार असून, केरळमधील थुंबा येथील डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देण्याची संधीही तिला मिळाली आहे.

धनश्री ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा, केंद्र राजुरी, ता. जामखेड येथील इयत्ता आठवीत शिकत आहे. तिच्या या यशामुळे शाळा, गाव आणि परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

या यशासाठी धनश्रीला शाळेचे मुख्याध्यापक संदीप भालसिंग, वर्गशिक्षक तथा पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे, मार्गदर्शक शिक्षक राहुल लिमकर, अर्चना त्रिमुखे, प्रशांत होळकर, शबाना शेख, वृषाली खांदवे आणि अमृता रसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

धनश्रीच्या यशाबद्दल जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, राजुरी केंद्राचे समन्वयक माजिद शेख, अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजयदादा काशिद, माजी सरपंच रितूताई अजयदादा काशिद, माजी उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, पालक आणि ग्रामस्थांनी धनश्रीसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

धनश्रीच्या या उल्लेखनीय यशामुळे सारोळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशाने शाळेचा आणि गावाचा गौरव वाढला असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Ad 1
Previous Post

करमाळ्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन; ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

चिखली स्पाईन रोडवर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, अपघाताचा धोका!

Related Posts

ताज्या घडामोडी

करमाळ्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन; ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

October 23, 2026
0
दख्खन धनगरवाडीत दसरा उत्साहात साजरा; धनगरी गजा, गरबा अन् बाळ्या डान्सने रंगला सोहळा!
ताज्या घडामोडी

दख्खन धनगरवाडीत दसरा उत्साहात साजरा; धनगरी गजा, गरबा अन् बाळ्या डान्सने रंगला सोहळा!

October 23, 2026
43
भुदरगड तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
ताज्या घडामोडी

भुदरगड तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?

October 23, 2026
14
अंधारसांगवीत कथित अवैध दारूविक्रीमुळे आदिवासी महिलांचे संसार धोक्यात; दारूबंदीची मागणी
ताज्या घडामोडी

अंधारसांगवीत कथित अवैध दारूविक्रीमुळे आदिवासी महिलांचे संसार धोक्यात; दारूबंदीची मागणी

October 23, 2026
2
अलिबाग–मुरुड मुख्य रस्त्याचे काम वेगात; प्रवासी आणि पर्यटकांना धुळीचा त्रास
ताज्या घडामोडी

अलिबाग–मुरुड मुख्य रस्त्याचे काम वेगात; प्रवासी आणि पर्यटकांना धुळीचा त्रास

October 23, 2026
6
जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

October 22, 2026
17
Next Post
चिखली स्पाईन रोडवर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, अपघाताचा धोका!

चिखली स्पाईन रोडवर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, अपघाताचा धोका!

ताज्या बातम्या

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम

October 23, 2026
मोरेवस्तीतील साने चौकात वेदनाशामक तेलाची विक्री; दाव्यांची सत्यता तपासण्याची मागणी

मोरेवस्तीतील साने चौकात वेदनाशामक तेलाची विक्री; दाव्यांची सत्यता तपासण्याची मागणी

October 23, 2026
चिखली स्पाईन रोडवर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, अपघाताचा धोका!

चिखली स्पाईन रोडवर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, अपघाताचा धोका!

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In