• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

by
November 16, 2025
in Blog
0
स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.
0
SHARES
2k
VIEWS
Ad 1

दौंड उमेद – स्त्री शक्ती प्रभाग संघ व सांजोबा ग्राम संघ येथील माजी अध्यक्ष नीलम दिवेकर यांनी पदावर असताना केलेल्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून निधीचा गैरवापर, पदांचा दुरुपयोग, आर्थिक अनियमितता आणि महिलांवर दबाव आणल्याच्या तक्रारी एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. भाजपा महिला पदाधिकारी सौ. नीलम भीमराव दिवेकर यांच्यावर महिलांनी केलेल्या आरोपांची संख्या वाढत असून तालुक्यातील २५०० महिला आंदोलनाच्या तयारीत आहेत.
लिपिकेच्या पगारात अनियमितता? सीआरपी व लिपिका यांना त्यांचे हक्काचे वेतन मागितल्याचे निदर्शनास आले असून; उर्वरित रकमेबाबत महिलांचा प्रश्न.श्री सांजोबा ग्राम संघातील लिपिका पदावरील महिलांनी आरोप केला की,
“लिपिकेचा पगार १३,००० रुपये काढला जातो, परंतु प्रत्यक्षात फक्त ३,००० रुपये दिले जातात आणि उर्वरित १०,००० रुपये सौ. नीलम दिवेकर घेत असल्याची माहिती मिळत आहे.”
तसेच नीलम दिवेकर यांनी बऱ्याच महिलांना ग्राम संघातून व प्रभाग संघातून अवैधरित्या पैसे दिले असून याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे कुठलीही परवानगी घेतली नाही व कोणताही पत्रव्यवहार केला नाही असे ग्राम संघातील व प्रभाग संघातील सदस्य महिलांनी सांगितले.
ही बाब लेखी तक्रारींमध्ये महिलांनी नमूद केली असून संबंधित दस्तऐवजांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत ग्राम संघातील प्रभाग संघातील सदस्य महिलांनी नीलम दिवेकर यांना जाब विचारला तर त्या संबंधित सीआरपी केडर कर्मचारी यांच्या वारंवार खोट्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे देतात
…तक्रारी देताना ते कोऱ्या कागदावर महिलांच्या सह्या घेऊन त्याचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर आणि खोटे आरोपांचे तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयांकडे देऊन अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात आणि वारंवार यामुळे ग्राम संघातील व प्रभाग संघातील महिलांची चौकशी झाल्यामुळे महिलांचे आर्थिक नुकसान आणि सामाजिक मानहानी करतात तसेच अभियानाच्या कामकाजात अडथळा निर्माण करतात सीआरपी व इतर केडर यांना कामकाज करू दिले जात नाही आणि त्यांच्यावर दबावाचे राजकारण करून वारंवार त्यांच्या खोट्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे देऊन त्यांना त्रास देण्यात येतो.
*लिपिका बदलताना खोटी सही? — गंभीर आरोप.*
ग्राम संघातील लिपिका मनीषा बोत्रे यांनी राजीनामा न दिल्याचा दावा करत महिलांनी सांगितले की,
“राजीनामा न देता दुसरी लिपिका नेमण्यात आली आणि खोटी सही करून राजीनामा सादर केल्याचा दावा महिलांनी केला आहे.”
या प्रक्रियेत नियमबाह्य निर्णय माजी अध्यक्ष नीलम दिवेकर यांनी घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलांनी केला आहे.
*कर्ज वितरणात अन्याय? — हप्ते भरायला सांगून कर्ज न दिल्याची तक्रार.*
एका महिलेने आरोप केला की,
“आमचे दोन हप्ते बाकी होते. मुलाच्या शिक्षणासाठी अधिक कर्ज हवे होते. सौ. नीलम दिवेकर यांनी सांगितले की दोन्ही हप्ते एकदम भरा, मग जास्तीचे कर्ज दिले जाईल. त्यामुळे मी ५ रुपये टक्क्यांनी सावकारी पैसे घेऊन दोन्ही हप्ते भरून टाकले. पण नंतर मला कर्ज न देता दुसऱ्याच व्यक्तीला कर्ज दिले गेले.”
महिलेचे म्हणणे आहे की तिच्यावर सूडबुद्धीने अन्याय केला गेला.
*बचत गटांना बँकेचे कर्ज प्रकरण करताना नीलम दिवेकर महिलांकडून अवैधरित्या पैसे घेतात.*
बऱ्याच बचत गटांकडून बचत गटातील महिलांकडून अवैधरित्या पैसे घेतल्याचे आरोप महिलांनी केले आहेत.
मार्गदर्शक सूचनेनुसार नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत मिळालेल्या ड्रोनचे कुठलेही माहिती देत नाहीत तो वैयक्तिक वापरत असल्याचा आरोप महिलांचा आहे.
*धमक्या, दबाव आणि महिलांचे फसवणूक करीत दहशत निर्माण केल्याचे आरोप.*
वेगवेगळ्या गावांतील महिलांनी असा आरोप केला आहे की—
“सौ. नीलम दिवेकर या महिलांना धमकावतात.”
“माझ्या विरोधात गेलात तर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगितले जाते.”
“त्यांचे पती भीमराव दिवेकर महिलांसमोर म्हणतात, ‘दोन दिवसात तुम्हाला नोकरीवरून काढून टाकीन’.”
“ते वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आरेरावीची भाषा करतात. तुमच्या नोकऱ्या घालवतो तुम्हाला कामावरून काढून टाकू असे अधिकाऱ्यांना बोलतात”
महिलांचे म्हणणे आहे की जर वरिष्ठांशीच असा वागणूक असेल तर सामान्य महिलांशी कशी असेल, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.
उमेद अभियानातील ग्राम संघाची व प्रभाग संघाची पदाधिकारी पदे ही राजकीय व्यक्तींसाठी नसतात असा नियम असून देखील तरीदेखील नीलम दिवेकर या अभियानातील पदांवर कायम अवैधरित्या कामकाज करीत आहेत.
उत्पादक बचत गटातून महिला सदस्यांना अवैद्यरित्या गटातून परस्पर सूडबुद्धीने काढून टाकले जाते असे आरोप आणि तक्रार महिलांनी केलेली आहे.
तक्रारींवर वरिष्ठांची दखल नाही? उदासीनतेचा आरोप

दौंड तालुका अभियान कक्षातील अधिकाऱ्यांनीही महिलांना सांगितले की—
“तक्रारी वरिष्ठांकडे पाठविल्या आहेत, त्यावर कारवाई होत आहे. संबंधित व्यक्तींनी राजकीय बाळाचा वापर करीत नोकरीवरून काढून टाकतो अशा धमकी देत आमच्यावरही दबाव आणला आहे.”

RelatedPosts

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

या सर्व प्रकरणावर वरिष्ठांचे मौन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
१० ग्राम संघांचा एकमुखी निर्णय — ‘कारवाई न झाल्यास अभियानातून बाहेर पडू’
स्त्री शक्ती प्रभाग संघातील १४ पैकी १० ग्राम संघांनी एकमताने ठराव केला आहे की—
“BMFI श्री. सचिन आटोळे व सौ. नीलम दिवेकर यांच्यावर चौकशी करून कारवाई झाली नाही तर आम्ही २५०० महिला उमेद अभियानापासून वेगळे होऊ.”
या संदर्भात गट विकास अधिकारी दौंड, जिल्हा अभियान व्यवस्थापक, प्रकल्प संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
आमरण उपोषणाचा इशारा
या महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे—
> “कारवाई झाली नाही, तर सर्व महिला आमरण उपोषण करणार.”
उमेद अभियानासारख्या महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनांमध्येच महिलांना असे प्रसंग सहन करावे लागत असतील, तर हा विषय शासन स्तरावर गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Previous Post

जत तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीत दिसत आहे पडद्यामागील राजकारण

Next Post

माजी नगरसेवक विकास पाटील सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात
Blog

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
15
आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
Blog

आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 2, 2026
5
चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
15
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
16
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
21
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
53
Next Post

माजी नगरसेवक विकास पाटील सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आत्माअंतर्गत वालखेडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In