
काल रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे सिंदखेडराजा मधील मलकापूर सर्कल हे पावसाने झोडपून काढले आहे मलकापूर सर्कल मधील कुंभेफळ गावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी व पिके हे पूर्णपणे वाहून गेलेले आहे व गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
शिवारातील सर्व जमिनी हे पूर्णपणे खरबडून गेले आहे व पिके पूर्णपणे वाहून गेलेले आहे.
प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर शेत जमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे

