भडगाव प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताने येथे एका ९ वर्षीय नाभिक समाजातील बालिकेवर ७० वर्षीय नराधमाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घृणास्पद घटनेचा येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाने तीव्र निषेध केला आहे. या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी समाजाने भडगाव येथील नायब तहसीलदार रमेश देवकर आणि पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन दिले. यासोबतच, आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या जातिवाचक शब्दाच्या उल्लेखाचा देखील निवेदनातून निषेध करण्यात आला आहे.
या भयानक घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला गेला असून, नराधमी प्रवृत्तीला कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. नराधमास तात्काळ आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. सदर खटला चालवण्यासाठी अँड. उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावा. पीडित कुटुंब व समाजाला त्वरित न्याय मिळावा. अश्या माण्या निवेदनातुन समाजाने प्रशासनाकडे केल्या आहेत. या घटनेच्या निषेधासोबतच, आ. जयंत पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या कथित जातिवाचक आणि अपमानजनक वक्तव्याचाही तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रवींद्र शिरसाठ, सचिव भरत ठाकरे, खजिनदार दीपक शिरसाठ, आणि कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, नामदेव चव्हाण, किशोर निकम, भगवान नेरपगारे, नारायण नेरपगार, भरत चव्हाण, हिलाल नेरपगारे, प्रभाकर नेरपगारे, काशिनाथ शिरसाठ, निलेश महाले (पत्रकार), राकेश शिरसाठ, राजेद्र सोनवणे, शिवाजी शिरसाठ, आर. डी निकम, गणेश शिरसाठ, आर. डी. वाघ, भाऊसाहेब वाघ, अभिलाष वाघ, धर्मराज निकम, सजय निकम, दिपक नेरपगारे, निबा नेरपगारे, रगनाथ आण्णा यांच्यासह अन्य अनेक मान्यवर व सदस्य, नाभिक समाज बाधव सह कजगाव, कोठली, गोडगाव, गुढे, अजनविहीरे येथूनही मोठ्या संख्येने समाजबांधव निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते.



