मारेगाव प्रतिनिधी : | सारथी महाराष्ट्राचा
मारेगाव तालुक्यातील मार्डी सर्कलमधील ग्राम मुकुटबन येथे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या आपसी वादातून मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उभी असलेल्या बैलगाडीच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत जाऊन मारहाणीत परिवर्तित झाला. या प्रकरणात अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित फिर्यादीने या प्रकरणी तिघांविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून प्राप्त माहितीनुसार अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.




