विरार (प्रतिनिधी)
विरार पश्चिम येथील तिरुपती नगर फेज २ परिसरात भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८२७ आणि प्रगती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विभागातील कार्यकर्ते प्रशांत तांबे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध उपक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय भीम” घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.









