• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!
0
SHARES
312
VIEWS
Ad 1
Ad 1

२० मतांनी ठराव पारित; नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

पुणे प्रतीनिधी

RelatedPosts

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

शिरूर : शिरूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांना पदावरून दूर करण्यासाठी मांडण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. उपनगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या बाजूने २० मते पडल्याने त्यांना उपनगराध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सभेत जाहीर केले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिरूर नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय श्री. रसिकभाऊ धारिवाल सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५५-१अ अन्वये उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासंदर्भातील तरतुदीनुसार, नगरपरिषदेच्या सदस्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती.

२६ ऑक्टोबर रोजी दिली होती नोटीस
शिरूर नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करत नगरपरिषदेच्या नगरसेविका संगीता महेंद्र मल्लाव व इतर १८ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा लवकरात लवकर आयोजित करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात संबंधित नगरसेवकांनी दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नगराध्यक्षा यांना सूचना नोटीस दिली होती. या नोटिशीच्या अनुषंगाने अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार दि. ३० ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली.

२८ पैकी २७ सदस्यांची उपस्थिती; सहा सदस्यांचा सभात्याग
विशेष सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला नगरपरिषदेच्या एकूण २८ सदस्यांपैकी २७ सदस्य उपस्थित होते. मात्र, सभेदरम्यान सहा सदस्यांनी सभात्याग केला. यामध्ये उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, स्वप्नाली योगेश जामदार, सुनीता संतोष पोटे, चारुशिला गणेश कोळपकर, रवी ऊर्फ शाम मनोहर ढोबळे आणि अमोल दादासाहेब चव्हाण यांचा समावेश होता.

२० मतांनी अविश्वास ठराव मंजूर
सभेत उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांना पदावरून दूर करण्यासंदर्भातील प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. उपनगराध्यक्षांना पदावरून काढून टाकण्याच्या बाजूने सर्वाधिक २० मते पडली. त्यामुळे अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी जाहीर केले. त्यानुसार मितेश प्रदीप गादिया यांना शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपस्थित सदस्यांचे आभार मानून सभेची सांगताविशेष सर्वसाधारण सभेतील संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सहकार्य केले. त्याबद्दल उपस्थित सदस्यांचे आभार मानून सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी जाहीर केले. शिरूर नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडींमध्ये उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर होणे ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

Next Post

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

Related Posts

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
0
दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन
ताज्या घडामोडी

10
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत
ताज्या घडामोडी

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
9
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
ताज्या घडामोडी

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026
1
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर
ताज्या घडामोडी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

October 30, 2026
8
Next Post
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

ताज्या बातम्या

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

October 30, 2026
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In