• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जुन्नर तालुक्यातील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या अंतिम वर्ष बी.फार्म विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) व GATE (Graduate Aptitude Test in Engineering) 2026 या परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. GPAT 2026 मध्ये कु. तांबोळी मेहर (स्कोअर: 220 | AIR: 1682),

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कु. सीमा घोडे (स्कोअर: 201 | AIR: 2867) आणि कु. आरती वाघमारे (स्कोअर: 197 | AIR: 3223) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. तर GATE 2026 मध्ये कु. वैष्णवी लंघे (स्कोअर: 384 | AIR: 5190) हिने यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला.
या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, समर्पण आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशामागे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे प्रमुख प्रा. शुभम गडगे तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करता आले.


यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके तसेच कॅम्पस डायरेक्टर मा. राजीव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. सचिन दातखिळे तसेच डी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. शीतल गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उल्लेखनीय यशामुळे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा अधोरेखित केली असून, भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल

Next Post

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे ‘दुहेरी’ यश

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे ‘दुहेरी’ यश

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे 'दुहेरी' यश

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In