• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे ‘दुहेरी’ यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे ‘दुहेरी’ यश
0
SHARES
96
VIEWS
Ad 1

गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेल्हे नंबर-१ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एन.एस.एस.ई.’ (NSSE) आणि ‘मंथन’ परीक्षांच्या निकालात शाळेने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

शाळेतील विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू विकासासाठी मंथन, ऑलिंपियाड, बी.टी.एस. आणि एन.एस.एस.ई. यांसारख्या परीक्षांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे:
एन.एस.एस.ई. परीक्षा (राज्य गुणवत्ता यादी):
आरोही अजिंक्य भालेराव (196/200)
नित्या रमेश भालेराव (192/200)
स्वराली राहुल कोकणे (190/200)
एन.एस.एस.ई. (जिल्हा गुणवत्ता यादी):
आलिया अमीर सय्यद (180/200)
ऋत्वी निवृत्ती बांगर (176/200)
यशश्री सचिन बनकर
(166/200)

   मंथन परीक्षेमध्ये  कु. मनस्वी पंकजकुमार जैसवार-इयत्ता पहिली 114/150

​

कु. क्षितिजा सुनील थोरात-इयत्ता दुसरी110/150
​ कु. आरोही अजिंक्य भालेराव 268/300
कु. आलिया अमीर सय्यद 258/300
कु. ऋत्वी निवृत्ती बांगर 246/300 इयत्ता तिसरी या विद्यार्थिनींनी यश संपादन केले.या यशाबद्दल जुन्नर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय राजेंद्र पिंगट यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पिंगट यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रगतीचे विशेष कौतुक केले.
यशाचे शिलेदार आणि अतिरिक्त सराव करून घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. नूरजहाँ पटेल, सौ. प्रविणा नाईकवाडी, सौ. मिरा बेलकर, श्री. संतोष डुकरे, श्री. हरिदास घोडे, श्री. अशोक बांगर, श्री. रोहिदास साळवे आणि सौ. सुषमा गाडेकर , श्रीम. अंजना चौरे यांचेही कौतुक केले.
तसेच स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने विविध सराव परीक्षांचे शाळेमध्ये आयोजन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या स्वाती कोकणे,नसरीन पठाण आणि प्रज्ञा शर्मा यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले, ज्येष्ठ सदस्य ईश्वर पिंगट, शिक्षणतज्ज्ञ विलास पिंगट , जादूगार प्रकाश शिरोळे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सखाराम शेंडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

“शाळेतील शिस्तबद्ध सराव आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच आमच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. भविष्यातही जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेचा हा आलेख चढता ठेवेल.”
— श्री. सखाराम शेंडकर (मुख्याध्यापक)

Previous Post

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी.

Next Post

शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.

शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In