• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; भव्य रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; भव्य रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले.
0
SHARES
51
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष व समिती अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

एरंडोल प्रतिनिधी/ तुषार शिंपी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल येथे मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. मोटरसायकल रॅली, जयघोष आणि भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री किशोर काळकर,प्रा.मनोज पाटील,आनंद दाभाडे,अतुल महाजन,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर युवा कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढत “जय भीम” च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.

माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

संध्याकाळी वाजतगाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाद्यांच्या तालावर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत हजारो नागरिकांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर अनुयायांनी फुलून गेला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

माल्यार्पण प्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,खडके सिम हायस्कूलचे चेअरमन जगदीश पाटील, ॲड.ओम त्रिवेदी, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील,पी.जी.पाटील, डॉ.संग्राम पाटील, डॉ.बाबा बोहरी, किशोर निंबाळकर, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण बागुल,मयुर अहिरे, प्रविण बाविस्कर, समितीचे कोषाध्यक्ष संघरत्न गायकवाड,मोहन सैंदाणे, सुरेश सोनवणे, अनील पाटील,प्रा.भरत शिरसाठ,प्रा.संदीप कोतकर, डॉ.अतुल सोनवणे, रणजित मोरे, भैय्या अहिरे, मनोहर बोडरे,रवि बोरसे,प्रा.नरेंद्र गायकवाड व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

Next Post

“हिन्दू सम्मेलन ” प्रचंड संख्येने उपस्थित रहावे: मनोज केशवराव पवार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
“हिन्दू सम्मेलन ” प्रचंड संख्येने उपस्थित रहावे: मनोज केशवराव पवार

"हिन्दू सम्मेलन " प्रचंड संख्येने उपस्थित रहावे: मनोज केशवराव पवार

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In