• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मुंबई (प्रतिनिधी) :
समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा रविवार (दि. १९ एप्रिल २०२६) रोजी कांदिवली पूर्व, मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

या सोहळ्यात लातूर येथील दैनिक जगमित्रचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव

सन २०१७ पासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या संतोष सोनवणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने जनजागृती केली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्यास हातभार लागल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समाजकार्यकर्ते अ‍ॅड. बाळासाहेब तोरस्कर होते. आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक मंगेश अनंत नाईक यांच्या हस्ते झाले.

स्वागताध्यक्ष म्हणून सौ. मीनाक्षी महादेव पाखरे, तर ट्रस्टचे सचिव महेश महादेव पाखरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रेरणादायी विचारांचा संदेश

या प्रसंगी डॉ. अलका नाईक आणि डॉ. रावसाहेब घोडेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजहितासाठी प्रामाणिक कार्याची गरज अधोरेखित केली. आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी पत्रकारिता व समाजकार्य हे लोकशाहीचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात कला, क्रीडा, साहित्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सोहळ्याला रंगत आली.

संपूर्ण कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली आणि सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Tags: Raghavendra Debadwar
Previous Post

जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

दुघाळा गावाचा अभिमान वाढला; मुरलीधर गणपती अडाणी यांची ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती

Related Posts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
ताज्या घडामोडी

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

June 5, 2026
8
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका
ताज्या घडामोडी

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

June 5, 2026
55
पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान
ताज्या घडामोडी

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

June 5, 2026
16
जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार
ताज्या घडामोडी

जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार

June 4, 2026
481
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
ताज्या घडामोडी

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
50
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026
45
Next Post
दुघाळा गावाचा अभिमान वाढला; मुरलीधर गणपती अडाणी यांची ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती

दुघाळा गावाचा अभिमान वाढला; मुरलीधर गणपती अडाणी यांची ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती

ताज्या बातम्या

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

June 5, 2026
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

June 5, 2026
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

June 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In