• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालना मर्चंट बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; ३ आरोपींना अटक, ६ दिवसांची पोलीस कोठडी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जालना (दि. २० एप्रिल २०२६) :
जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.

रामेश्वर विलासराव जाधव, ज्ञानेश्वर विलासराव जाधव (दोघे रा. भोकरदन) आणि सुधाकर रावसाहेब ठोंबरे (रा. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

बनावट कागदपत्रांद्वारे मोठा घोटाळा

या प्रकरणात वेअर हाऊसच्या नावावर १७७ बनावट खातेदार तयार करून बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 220/2026 अंतर्गत BNS 2023 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधीच दोन मुख्य सूत्रधार अटकेत

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ आणि निलेश्वर शेषराव भोसले (सिंदखेड राजा, बुलढाणा) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांना २४ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.

एजंट नेटवर्कचाही सहभाग उघड

तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, काही एजंटांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, लायसन्स काढणे आणि मार्केट कमिटी पावत्या बनवणे यासारखी कामे करून खातेदारांना १० ते २० हजार रुपयांचे आमिष दाखवले होते. या नेटवर्कमधील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अधिक आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के व इतर पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Previous Post

धनगर समाजाची चौंडी येथे मागणी; विद्याताई मोटे यांना विधानपरिषद संधी देण्याचे आवाहन

Next Post

लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे यांना “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान; मुंबईत भव्य सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In