खामगाव प्रतिनिधी –
खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बस सेवेचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते या ई-बसचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी ई-बस सेवा ही पर्यावरणपूरक तसेच आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असल्याचे सांगितले. भविष्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ई-बस सेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-बसच्या शुभारंभामुळे खामगाव शहरातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










